वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 30 डिसेंबर 2019

वाचक लिहितात...
निवेदन :
 ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

‘निद्रानाश’ हा उपयुक्त लेख
‘सकाळ साप्ताहिक’च्या २१ डिसेंबरच्या अंकातील डॉ. अविनाश भोंडवे यांचा ‘निद्रानाश - आरोग्याचा सर्वनाश’ हा लेख अतिशय उपयुक्त आहे. झोप का आवश्‍यक आहे, झोप न लागल्यास त्याचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम यांची माहिती या लेखातून मिळते. हल्लीच्या वाढत्या ताणतणावामुळे शांत झोप लागण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे कामेही नीट होत नाही. डॉ. भोंडवे यांनी सुचविलेल्या उपायांमुळे नक्कीच फायदा होऊ शकेल. याच अंकातील ‘बहुगुणी सुकामेवा’ हा लेखही आरोग्यदायी माहिती देणारा आहे. 
- अंजली कारखानीस, पुणे

‘डेस्टिनेशन वेडिंग’चा देखणा अंक
 ‘सकाळ साप्ताहिक'चा ७ डिसेंबरचा ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा अंक देखणा झाला आहे. अंकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. 'डेस्टिनेशन वेडिंग'बद्दल आणि ठिकाणांबद्दल जास्तीत जास्त माहिती देऊन अंक माहितीपूर्ण करण्याचा प्रयत्न दिसला. अशा प्रकारचे लग्न म्हणजे निव्वळ खर्च असा अनेकांचा गैरसमज असतो. परंतु, या अंकामुळे तो काही अंशी का होईना कमी होईल. कारण अशा लग्नातून मिळणारा आनंद तर खूप जास्त असतो; शिवाय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्याचे प्रमाणही डेस्टिनेशन वेडिंगमुळे खरेच वाढते आहे. लग्नातील फॅशनच्या आणि मेकअपच्या काही खास टिप्सही मिळाल्या. 
- मनाली शिंदे, चिंचवड
 

संबंधित बातम्या